माहूरगड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

माहूरगड

माहूरगड हा नांदेडपासून १३० किमी (८१ मैल) अंतरावर असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील, माहूर तालुक्यात आहे. येथील पर्वत रंगावर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तीर्थक्षेत्र रेणुकादेवी चे मंदिर आहे. हे देवीचे मंदिर माहूर गावापासून २ किमी अंतरावर आहे

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक किनवट आहे, जे माहूरपासून ५० किमी अंतरावर आहे. माहूर गाव राज्य महामार्गाने जोडलेले आहे. माहूरगडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, जे माहूर गावाच्या दक्षिणेस टेकडीवर असलेल्या रेणुकादेवीच्या मंदिरापासून सुरू होतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात. किनवटहून आणखी एक मार्ग आहे, परंतु तो घनदाट जंगलातून जातो. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी आणखी १ तास लागतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →