मासिलम गाय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मासिलम गाय हा भारतातील एक शुद्ध देशी गोवंश असून हा प्रामुख्याने मेघालय प्रांतात आढळतो. भारतीय कृषी संशोधन परिषद ने मशागतीचा आणि मांसाहारासाठीचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे.

हा गोवंश मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन करतो. खासी भाषेत 'मासी' म्हणजे गुरेढोरे आणि 'लम' म्हणजे टेकड्या असा अर्थ होतो, म्हणून या गोवंशाला "मासिलम" असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →