विंडोज ही मायक्रोसॉफ्टद्वारे विकसित केलेली संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम (कार्यप्रणाली) आहे. ही प्रणाली प्रथम १९८५ मध्ये एमएस-डॉस वर आधारित आलेखीय (ग्राफिकल) ऑपरेटिंग सिस्टम म्हणून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या आवृत्तीनंतर अनेक पुढील आवृत्या आल्या आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस, विंडोज मालिका दोन स्वतंत्र आवृत्यांमध्ये विभागली गेली: ग्राहकांसाठी 'विंडोज ९एक्स' आणि व्यवसाय व उद्योगांसाठी 'विंडोज एनटी'. त्यानंतरच्या वर्षांत, विंडोजच्या आणखी काही प्रकारांच्या आवृत्या सादर केल्या गेल्या: १९९६ मध्ये एम्बेडेड सिस्टीमसाठी 'विंडोज सीई'; २००० मध्ये पर्सनल डिजिटल असिस्टंट्स आणि नंतर स्मार्टफोनसाठी 'पॉकेट पीसी' (ज्याचे २००३ मध्ये 'विंडोज मोबाईल' आणि २०१० मध्ये 'विंडोज फोन' असे नामांतर झाले); २०१६ मध्ये एआर/व्हीआर हेडसेटसाठी 'विंडोज हॅलोग्राफिक'; आणि इतर अनेक आवृत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सर्व आवृत्त्यांची यादी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.