विंडोज एक्सपी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विंडोज एक्सपी (इंग्लिश: Windows XP) ही मायक्रोसॉफ्टने निर्माण केलेली व खासगी संगणकांवर (गृह, व्यापारी, मीडिया केंद्रांसह) चालणारी संचालन प्रणाली आहे. २४ ऑगस्ट २००१ रोजी ती प्रथम संगणक उत्पादकांना मिळाली. संगणकावर प्रस्थापित केलेली आणि वापरावयास सोईस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय संचालन प्रणाली आहे. एक्सपी (XP) हे नाव eXPerience (अनुभव) या शब्दाचे लघुरूप आहे. निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव व्हिसलर असे होते.

विंडोज एक्सपी ही विंडोज मिलेनियम व विंडोज २००० या दोन्हींची उत्तराधिकारी असून, विंडोज एनटी केर्नेल व आर्किटेक्चरवर आधारित पहिलीच वापरसुलभ संचालन प्रणाली होती. विंडोज एक्सपीची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ला सुरू झाली. जानेवारी २००६मध्ये विंडोज एक्सपीच्या ४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या, असे एका आयडीसी विश्लेषकाचे अनुमान आहे. विंडोज एक्सपीच्या नंतर विंडोज व्हिस्टा ठोक वापरकर्त्यांना ६ नोव्हेंबर २००८पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७पासून मिळू लागली. विंडोज एक्सपीच्या मूळ निर्मात्याने या प्रणालीची किरकोळ विक्री ३० जून २००८ला थांबवली. मात्र, मायक्रोसॉफ्टने नवीन संगणकाची जोडणी करणाऱ्यांना विंडोज एक्सपी ३१ जानेवारी २००९ पर्यंत विकली.

घरगुती वापरासाठी केलेली विंडोज एक्सपी गृह आवृत्ती, व विंडोज एक्सपी व्यावसायिक आवृत्ती या दोन्ही आवृत्त्या सर्वात जास्त लोकप्रिय होत्या. या व्यावसायिक आवृत्तीत विंडोज सर्व्हर डोमेन्स व दोन भौतिक प्रक्रियाकार यांसारखी वैशिष्ट्ये होती. व ती शक्तीशाली वापरकर्ते, व्यवसाय व उपक्रम ग्राहक यांसाठी बनवण्यात आली होती. विंडोज एक्सपी मीडिया केंद्र आवृत्तीत दूरदर्शन कार्यक्रम साठवणे व पाहणे, डीव्हीडी चलचित्र पाहणे, संगीत ऐकणे या अतिरिक्त क्षमता होत्या. विंडोज एक्सपी टॅब्लेट संगणक आवृत्ती ही टॅब्लेट संगणकांवर चालण्यासाठी बनवली होती.

विंडोज एक्सपी अंततः दोन अतिरिक्त आर्किटेक्चर्ससाठी बनवली गेली, विंडोज एक्सपी ६४-बिट आवृती आयए-६४ (इटॅनियम) प्रक्रियाकारांसाठी व एक्स८६-६४ साठी असलेली विंडोज एक्सपी व्यावसायिक एक्स६४ आवृत्ती. विंडोज एक्सपी एम्बेडेड ही विंडोज एक्सपी व्यावसायिक आवृत्तीची घटक आवृत्ती, व विशिष्ट बाजारांसाठी असलेली विंडोज एक्सपी आरंभिक आवृत्ती हेही त्यातच येतात. एका उत्पादकाने २००९ मध्ये विंडोज एक्सपी संचालित सेल्युलर भ्रमणध्वनी तयार केला.

विंडोज ९५, ९८, आणि विंडोज मिलेनियमपेक्षा, सी, सी++, असेंब्ली यांतून प्रोग्रॅमिंग केलेल्या एनटी-आधारित विंडोजच्या आवृत्त्या अधिक स्थिर व अधिक कार्यक्षम आहेत. विंडोजच्या पूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा वापरकर्त्यास अधिक सोपी, अशी ग्राफिकल सदस्य आंतरपृष्ठ विंडोज एक्सपीने सादर केले. त्याच वेळी, अवैध नकलांना रोखण्यासाठी विंडोजने "डीएलएल हेल" नावाची एक नवीन सॉफ्टवेर व्यवस्थापन सुविधा निर्माण केली. त्यामुळे विंडोज ९५-९८ या आवृत्त्यांची निर्मिती सोपी झाली. ही व्यवस्थापन सुविधा, आवृत्यांच्या सक्रिय उत्पादनासाठी साहाय्यभूत असणारी विंडोजची पहिलीच कृती होती.

आंतरजाल विश्लेषकांच्या मते विंडोज एक्सपी ही सप्टेंबर २००३ ते जुलै २०११ या काळात जगातली सर्वांत जास्त वापरली जाणारी संचालन प्रणाली होती. आजही ती भारतात सर्वांत जास्त वापरली जाणारी संचालन प्रणाली आहे. विंडोज ७च्या प्रकाशनानंतर एक्सपीचा वापर घटत गेला. तिचा सर्वांत जास्त वापर जानेवारी २००७ मध्ये ७६.१% होता. सध्या तो २७.३% आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →