मानिनी डे

या विषयावर तज्ञ बना.

मानिनी डे

मानिनी डे किंवा मानिनी मिश्रा ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे, जी श्श्श्श... कोई है मध्ये कटिया आणि जस्सी जैसी कोई नहीं मध्ये परी कपाडियाची भूमिका साकारून प्रसिद्धीस आली. ती सीआयडी मधील डॉ. सोनाली बर्वेच्या भूमिकेसाठी देखील ओळखली जाते. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने लाडो २ मध्ये शगुनची भूमिका साकारली होती. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत ती दालचिनी मध्ये राजराणी परम ढिल्लनच्या भूमिकेत दिसली होती.

तिचे पहिले लग्न पाच वर्षे टिकले आणि त्यानंतर तिचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला, ज्यांच्यापासून तिला दियानूर "दिया" नावाची एक मुलगी होती (जन्म २०००). मानिनीने ३० डिसेंबर २००४ रोजी टेलिव्हिजन अभिनेता मिहिर मिश्रा यांच्याशी लग्न केले. जुलै २०२० मध्ये, डे यांनी बॉम्बे टाइम्सला सांगितले की ती आणि मिश्रा गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →