मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती

ज्या स्वेच्छेने किंवा काही परिस्थितींमुळे आधुनिक नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिल्या किंवा रहात आहेत अशा मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या काही जमाती आहेत. त्यांना हरवलेल्या किंवा अलिप्त जमाती असेही म्हणतात. नागर संस्कृतीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत अशा अतिशय कमी संख्येत असणाऱ्या लोकांशी संपर्क न साधता त्यांना स्वतंत्रपणे जगू द्यावे, असे काही एतद्देशीय हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसे न केल्यास ते त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचे उल्लंघन होईल, असे त्यांचे मत आहे. बहुतेक अलिप्त जमाती दक्षिण अमेरिका, न्यू गिनी, भारत व मध्य आफ्रिका या भागातील घनदाट वनप्रदेशात राहतात. या जमातींच्या अस्तित्वासंबंधीची माहिती ही मुख्यत: शेजारील जमातीच्या लोकांशी अनवधानाने झालेल्या संपर्काने किंवा कधी कधी हिंसक चकमकीतून आणि हवाई फुटेजमधून मिळते. अशा जमातीतील लोकांमध्ये सामान्य रोगांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते किंवा नसूही शकते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधल्यास रोगराईने त्यांच्यातील अनेक लोक दगावू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →