मानवी विकास निर्देशांक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मानवी विकास निर्देशांक

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.

१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →