मान कौर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मान कौर

मान कौर (१ मार्च, १९१६ - ३१ जुलै, २०२१) ह्या एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट होत्या. त्यांनी विविध कार्यक्रमांसाठी १०० वर्षांहून अधिक वयोगटातील श्रेणींमध्ये धावण्याचे जागतिक विक्रम केले आहेत. वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला होता.

मान कौर यांचे पुत्र गुरदेव सिंग हे एक अनुभवी खेळाडू आहेत. ते पंजाब विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानावर रोज धावत असत. इ.स. २००९ मध्ये, जेव्हा मान कौर वयाच्या ९० च्या आसपास होत्या तेव्हा त्यांनी आपल्या मुलासोबत पीयू ग्राउंडवर धावायला सुरुवात केली. रोज सकाळ संध्याकाळ त्या नियमित धावण्याचा सराव करत असत. त्यांची तळमळ आणि समर्पण पाहून गुरदेव सिंग यांनी त्यांना व्हेटरन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही. मान यांनी १२ वर्षात ८०हून अधिक पदके जिंकली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →