माऊली हा २०१८ सालचा मराठी भाषेतील मारामारीपट आहे. तो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आहे आणि जेनेलिया देशमुख निर्मित आहे. क्षितीज पटवर्धन यांनी ह्या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटात संयमी खेरसह रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा २०१४ मधील 'लई भारी' या चित्रपटाचा सिक्वल नाही. सुरुवातीला हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार होता पण शाहरुख खान अभिनीत झिरो या चित्रपटाशी झगडा टाळण्यासाठी तो बदलून १४ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला. माउली चित्रपटाला सुपरहिट म्हणून घोषित केले गेले. हा फक्त ५०० ठिकाणीच प्रदर्शित करण्यात आला. याने त्याच्या गुंतवणूकीच्या दुप्पट कमाई केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माऊली (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.