माउंट ब्रॉस अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे.
या शिखराला विल्यम ब्रॉस या स्थानिक व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. ९ मार्च, १८६९ रोजी डॅनियल प्लमर आणि जोसेफ मायर्स या अल्मा गावातील व्यक्तींनी माउंट ब्रॉसवरील पहिल्या चांदीच्या खाणीचा दावा नोंदवला.
माउंट ब्रॉस
या विषयातील रहस्ये उलगडा.