माउंट कॅलिब्रॉन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर १४,२२३ फूट उंचीचे असून कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. याच्या सपाट माथ्यामुळे तसेच जवळ असलेल्या इतर तीन १४,००० फूट उंचीच्या डोंगरांमुळे क्वचित याला फॉर्टीनर्सच्या यादीत घातले जात नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माउंट कॅमेरॉन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!