माईण हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. तळकोकणातील निसर्गरम्य वातावरण आणि हिरवाईने नटलेले हे गाव स्थानिक जीवनशैली व सणसाज यासाठी ओळखले जाते. गावाचा परिसर निसर्गाने सुशोभित असून येथे पारंपरिक ग्रामजीवन टिकून आहे.चारही बाजूनी गच्च जंगलाने व्याप्त असलेल्या डोंगररांगा भेदत काळ्याभोर डांबरी रस्त्याने आपण खोलगट भागात डौलदार शांततेत पहुडलेल्या या गावात पोहचतो. तेव्हा प्रत्येक वळणावर निसर्गाच्या देखण्या रूपाचा निरनिराळा कॅनव्हास आपल्या नजरेला पडत राहतो. असं म्हणतात की, इथल्या शेकडो वर्षे जुन्या असलेल्या जंगलात पूर्वी ऐनाची झाडे खूप जास्त होती. ऐन या नावाचा अपभ्रंश होऊन 'माईण' असे नाव गावाला पडले. तर कुणी असं म्हणतात की, चहूबाजुनी उंच डोंगर आणि मध्येच 'व्हायना' सारख्या खोलगट भागात वसलेले गाव म्हणून त्याचा अपभ्रंश होऊन 'माईण' असे नाव पडले.
*व्हायन - जमिनीत पुरलेली धान्य कांडण्याची एक खोलगट दगडी वस्तू*
माईण
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.