मांडोशी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मंदोशी :-

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.

राजगुरुनग पासून मंदोशी हे अंतर 50 कि.मी. इतके आहे. मंदोशी हे गाव, मंदोशी तळपेवस्ती (गावठाण), तर मोहन वाडी, हुरसाळेवाडी, रोकडे वस्ती, जावळेवाडी व केळेवाडी या वाड्या वस्ती मिळून मंदोशी गाव बनलेला आहे. मदोशी गावात तळपे, जढर,आंबवणे, उगले, सुतार, मसळे, बांगर आडनावाचे लोक राहतात.मोहन वाडी येथे मोहन, वाघमारे, बारवेकर, बांगर,केदारी, मराठे या आडनावाचे लोक राहतात. रोकडे वस्ती येथे रोकडे, पाटोळे, या आडनावाचे लोक राहतात. जावळेवाडी येथे गवारी, गोडे, कारभळ, मिलखे,तीटकारे, मोसे,तळपे,लोहकरे,मोरमारे, बुरुड,बेंढारी या आडनावाचे लोक राहतात.हुरसाळेवाडी येथे हुरसाळे,वाळुंज,आंबवणे,आंबेकर थरकुडे या आडनावाची लोक राहतात. ग्रामीण संस्कृतीवर लेखन करणारे रामदास तळपे हे याच गावचे आहेत.

लोक जीवन

मंदोशी गावात आदिवासी समाज व मराठा समाज असे दोनही समाज गुण्या गोविंदाने राहतात . धार्मिक व सामाजिक कार्यात हे दोन्ही समाज अग्रेसर असतात. मंदोशी गावात सर्व उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम सर्व लोक एकत्र मिळून करतात.

व्यवसाय व उपजीविका :-

मंदोशी गावच्या लोकांचा शेती व पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे जंगलात जाऊन हिरडा गोळा करणे, मध गोळा करणे, आंबे व करवंदे आणि जांभळे विकून आपली उपजीविका करतात. मंजुशी गावचा भूभाग हा जंगलाने व्यापलेला आहे. आंबा, जांभूळ, हिरडा, पळस, उंबर, पळस, ही मोठी झाडे आढळतात. तर करवंदे, आंबेळी, तोरणे ही झाडे सुद्धा आढळतात. यामधून लोक आपली उपजीविका भागवतात.

मंदोशी गावच्या भागात मोठ्या प्रमाणात भात शेती आहे. येथे जीर, आंबेमोहोर, खडक्या, कॉलम, इंद्रायणी, फुले समृद्धी, रायभोग इत्यादी भाताचे उत्पादन होते. काही लोक भात विकून पैसे मिळवतात. त्याचप्रमाणे नाचणीचे सुद्धा काही शेतकरी पीक घेतात.

मंदोशी गावचे धबधबे महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

अनेक शेतकरी गाई व म्हशी, बैल, गावरान कोंबड्या पाळतात. त्यामधून सुद्धा शेतकऱ्यांना ठराविक उत्पन्न मिळते. परंतु आता आधुनिक सामग्री उपलब्ध असल्यामुळे लोक बैला ऐवजी शेतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतात.

शाळा :-

मंदोशी गावात सातवी पर्यंत शाळा आहे. आणि अंगणवाडी सुद्धा आहे.

धार्मिक ठिकाण:-

मंदोशी गावात श्री काळभैरवनाथ मंदिर असून ते गावचे ग्रामदैवत आहे. चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा भरते. या यात्रेला हार तुरे, देवाचा अभिषेक, दंडवते, पालखी, इत्यादी धार्मिक कार्यक्रम केले जातात. पालखीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आकाशातील फटाके फोडले जातात. हे दृश्य खूप नयनरमय आणि बघण्यासारखे असते. रात्री येथे तमाशाचा कार्यक्रम होतो. तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा करतात. तत्पूर्वी समाजासाठी आमटी भात हे जेवण असते. मंदोशी येथील खास आमटी भात खाण्यासाठी लांब लांबून लोक येतात. येथील कुस्त्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे खूप लांब लांबून पैलवान मंडळी येत असतात.

श्री काळभैरवनाथ मंदिरा शेजारी मारुती मंदिर, कळमजाई मंदिर, मुक्तार मंदिर, व ही मंदिर आहेत. श्री काळभैरवनाथ देव हे अतिशय जागृत देवस्थान आहे. त्यामुळे दर रविवारी देवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात.

पर्यटन:-

पर्यटनाच्या बाबतीत मंदोशी हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदोशी येथून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे अंतर 21 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे भीमाशंकर ला जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी असते. जुलै ऑगस्टमध्ये येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील ओढे नाले, धबधबे, तुडंब भरून वाहू लागतात. शिवरात हिरवीगार भात शेतीव हिरवेगार डोंगर आणि त्यामधून वाहत असलेले धबधबे, ओढे नाले. हे दृश्य स्वर्गीय आनंदाची ग्वाही देते. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →