महेश मांजरेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९५८ - ) हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्त्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. 'कांटे'या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलुगू चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या. त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली.त्यांची सचिन खेडेकर,आणि विद्याधर उर्फ बाप्पा जोशींबरोबर जोडी प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महेश मांजरेकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.