महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१ पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे.
त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. त्यांतील सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषतः हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा आहे.
प्राथमिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात.
पूर्वी या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत असे. त्या विभागाला या स्पर्धेचे फारसे देणघेणे नव्हते. त्यामुळे बदल करून हल्ली या स्पर्धा सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येतात.
महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!