महाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल होय.महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.महाराष्ट्रास पश्चिमेस ८७७.९७ कि. मि. लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा आहे.प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देशातील सर्व राज्य होते. 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून 01 मे 2010 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे.महाराष्ट्राची दक्षिणात्तर लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 800किलोमीटर आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर आहे. राज्यातील सर्वात अलीकडील पालघर हा 36 वा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहील्यानगर सर्वात मोठा तर मुंबई शहर सर्वांत लहान जिल्हा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्राचा भूगोल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?