महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष

या विषयातील रहस्ये उलगडा.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याची मुख्य कायदा बनवणारी संस्था महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांच्या बहुमताने ५ वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते. या कालावधीमध्ये विधानसभेचे सदस्यत्व सोडेपर्यंत किंवा पदाचा राजीनामा देईपर्यंत अध्यक्ष पद धारण करता येते, परंतु विधानसभा सदस्यांच्या प्रभावी बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे विधानसभा अध्यक्षांना पदावरून दूर केले जाऊ शकते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते.

विधानसभेचे अध्यक्ष हे विधानसभा सभागृहातील कामकाज चालवतात आणि सभागृहात सादर केलेले विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवतात. ते सभागृहामध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखतात आणि सदस्यांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी त्यांना निलंबित करून शिक्षा देखील करू शकतात. ते नियमांनुसार अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचना यांसारखे विविध प्रकारचे ठराव सभागृहात मांडण्यास परवानगी देतात. चर्चा सत्रात चर्चेसाठी कोणत्या विषयपत्रिकेवर निर्णय घ्यायचा ते देखील अध्यक्ष ठरवतात. अध्यक्ष निवडीची तारीख महाराष्ट्राचे राज्यपाल निश्चित करतात. सभागृहाच्या सदस्यांनी केलेल्या सर्व टिप्पण्या आणि भाषणे ही अध्यक्षांना उद्देशून असतात, अध्यक्ष हा सभागृहाला उत्तरदायी असतो.

राहुल सुरेश नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →