महाराष्ट्र लोकसेवा आयोग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.

MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →