महाराष्ट्र पोलीस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १२ पोलीस आयुक्तालये व ३४ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे.



मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील ३रे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १२ आयुक्तालये आणि ३४ जिल्हा पोलीस घटक आहेत.



नव्याने स्थापन झालेले पिंपरी-चिंचवड आणि वसई-विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.

याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.

पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात, तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →