महाराष्ट्र ओपन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्र ओपन

महाराष्ट्र ओपन ही भारताच्या पुणे शहरामध्ये आयोजित केली जाणारी एक वार्षिक पुरुष टेनिस स्पर्धा आहे. पुण्यातील हार्ड कोर्टवर खेळवली जाणारी ही स्पर्धा ए.टी.पी.च्या ए.टी.पी. वर्ल्ड टूर २५० सीरीज ह्या शृंखलेचा भाग आहे. १९९६ साली सर्वप्रथम ह्या स्पर्धेचे आयोजन केले गेले. आजवर रफायेल नदाल, बोरिस बेकर, रिचर्ड क्रायजेक इत्यादी प्रसिद्ध टेनिसपटूंनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.

प्रारंभिक कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते चेन्नईला हलवण्यात आले होते आणि २०१८ पासून ही स्पर्धा पुण्यात गेले, जिथे ते जानेवारीमध्ये आयोजित केले जाते.

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन या संस्थांद्वारे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →