महादेव डोंगररांगा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

महादेव डोंगररांगा

महादेव डोंगररांग महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग आहे. ही पर्वतरांग राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर पूर्व-पश्चिम आहे. ही सह्याद्री पर्वतरांगेचा भाग समजली जाते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे पूर्व किंवा आग्नेय दिशेत विस्तारलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट आणि महादेव या नावांनी हे फाटे ओळखले जातात. त्यांपैकी सर्वांत दक्षिणेकडील, सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील फाटा म्हणजेच महादेव डोंगररांग होय. या डोंगररांगेला शंभू महादेवाचे डोंगर असेही संबोधले जाते. या डोंगररांगेत सलग रांगेशिवाय अनेक लहान लहान डोंगररांगा किंवा फाटे, अनेक एकाकी टेकड्या किंवा टेकाडे आढळतात. या डोंगररांगा बऱ्याच विदारित स्वरूपाच्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →