महादेव कोळी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

महादेव कोळी किंवा कोळी महादेव ही कोळी जमातीची एक उपजमात आहे असे मानववंश शास्त्रज्ञ एन्थोविन सांगतो. कोळी शब्दामधील को म्हणजे डोंगर आणि ळी म्हणजे एक जमात म्हणजे डोंगरात राहणारी जमात ला कोळी म्हणतात असे तो त्याचे पुस्तक द ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे मध्ये नमुद करतो. कोळी महादेव हे बालाघाट डोंगर रांगा तसेच महादेव डोंगर रांगामध्ये वास्तव्य करत, कालांतराने ते डोंगराहून खाली आले. या जमातीतील लोक महादेव डोंगरात राहत असल्याने तसेच महादेवाचे पूजक असल्याने त्यांना कोळी महादेव म्हटले जाते.

या जमातीचे उगमस्थान हे महादेव डोंगर आहे. तेथून ही जमात कालांतराने इ.स. १४०० च्या सुमारास स्थानांतरित व्हायला लागली. हळु हळु या जमातीचे लोक डोंगराळ भागातून समतल भागात आले. जे प्राथमिक स्थानांतर झाले, ते बालाघाट प्रांतात झाले, त्या काळातील बालाघाट म्हणजेच आजचा बेरार(विदर्भ) आणि बेरारला लागून असलेले मध्य प्रदेशमधील पर्वतीय क्षेत्र. यातील काही लोकांनी बेरार प्रांतात म्हणजेच अमरावती, अकोला,बीड, माजलगाव,वाशीम अशा जिल्ह्यात स्थायिक होऊन तिथेच आपली उपजीविका सुरू केली, ज्यात मजुरी करणे, वनराईत जाऊन डिंक गोळा करणे, तर काहींनी शेतीला पण सुरुवात केली. उरलेले लोक हे पुढे बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातून अहमदनगर, नाशिक, पुणे मधील प्रांतात पसरले.

पुणे भीमाशंकर ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात दाट संख्येने वसलेली आहे, पुणे, अहमदनगर ,नाशिक या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्येही आढळतात. महादेव कोळी ज्या प्रदेशात राहत असे त्यास पूर्वीस कोळवण असे संबोधले जात असे. कोळवण म्हणजे कोळ्यांचे वन किंवा कोळ्यांचे रान होय.याचाच अर्थ महादेव कोळयांची वस्ती प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात असे. महादेव कोळी जमातीचे मुळ वसतिस्थान महादेव डोंगर असल्याचे काही इतिहासकारांचे आणि युरोपियन अभ्यासकांचे मत आहे. महादेव डोंगरापासून बालेघाटद्वारे हे लोक महाराष्ट्रात आले असावेत. आजही या भागातील लोकगीतांतून बालेघाटाचा उल्लेख असलेली गाणी लोक गातात. महादेव कोळी हे नाव कसे पडले याला ऐतिहासिक पुराव्यांचाही आधार मिळतो. हैद्राबाद राज्य आणि बिदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराच्या रांगा (Mahadev Hills) आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते. तेथून ते बालेघाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. मध्य भारतातील कोल वंशाच्या जमातीशी त्यांचे बरेच साम्य असल्यामुळे त्यांना कोलवंशी असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →