महा एनजीओ फेडरेशन - २५०० सामाजिक संस्थेची शिखर संस्था
महाराष्ट्रातील २००० हुन अधिक सामजिक संस्थांची शिखर संस्था म्हणजे महाएनजीओ फेडरेशन . विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प.पू.श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या प्रेरणेने दि.१५ ऑगस्ट २०१८ रोजी हिची पुणे स्थापना झाली . सामजिक संस्था समाजात निर्हेतूकपणे समृद्ध व सशक्त समाज निर्मितीसाठी काम करत असतात . असे अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत मात्र त्या एक संघ नव्हत्या .त्या सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे कार्य महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून शेखर मुंदडा यांनी केले . उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र लोकनेते मा. देवेंद्रजी फडणवीस सरांचे विशेष मार्गदर्शन संस्थेस लाभते . अध्यात्म , सेवा व समर्पण या तत्वावर महाएनजीओची कार्यप्रणाली आहे . बहुतांश छोट्या सामजिक संस्था उत्तम कार्य करतात मात्र त्यांची नोंद समाजात हवी तशी घेतली जात नाही . काही संस्थांकडे उत्तम प्रकल्प व ते करण्याचे कौशल्य देखील आहे मात्र निधी अभावी ते पूर्ण होऊ शकत नाही. अशा संस्थांना महा एनजीओ च्या वतीने मदत उपलब्ध करून देऊन कार्य केले जाते. महा एनजीओ फेडरेशनने केलेल्या सेवा कार्याचे ४ .५ लक्ष हुन अधिक लाभार्थी आहेत. समाजातील प्रत्येक गरजवतांच्या समवेत संस्था खंबीर पणे आमच्या सक्षमतेनुसार उभे आहोत . समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे संस्थेला महत्वपूर्ण योगदान लाभते .
नोंदणीकृत असणाऱ्या संस्था ह्या प्रामुख्याने शिक्षण , आरोग्य सेवा , पर्यावरण व्यवस्थापन , महिला सक्षमीकरण, ग्राम विकास , अपंग व विकलांग , कृषी , जल व्यवस्थापन , अनाथ आश्रम , आध्यात्मिक , कचरा व्यवस्थापन , एचआयव्ही / एड्स विषयी कार्य , कायदेशीर सल्ला, गो सेवा ,सामजिक जनजागृती ,कौशल्य विकास , वृद्धाश्रम, सांस्कृतिक ,वंचित मुलांचे पुनर्वसन , उद्योजकता व रोजगार निर्मिती , नदी स्वछता , व्यसनमुक्ती , योग विज्ञान , आदिवासी विकास , बालविकास या २५ विषयांसमवेत अन्य काही महत्वपूर्ण बाबींवर कार्य करतात . या संस्थाना नोंदणी व कार्य पद्धती विस्तार यासाठी महाएनजीओ फेडरेशन संस्थाना पुर्णतः निशुल्क मार्गदर्शन करते. बुधवार पेठ येथील ९० बाधित महिलाना महा एनजीओ प्रत्येक महिन्यास पोषण आहार पुरवते . महाविद्यालयीन मुलांसाठी युवा संवाद हा महत्वपूर्ण उपक्रम संस्था करते . प्रत्येक महिन्यास ग्रामीण भागातील प्रबोधनासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक ५ ठिकाणी कीर्तन सेवेद्वारे प्रबोधन करतात . संस्थेचे आधारस्तंभ व आर्ट ऑफ लिविंगचे ज्येष्ठ शिक्षक मा.चंद्रकांतजी राठी यांचे विशेष योगदान संस्थेच्या प्रत्येक सेवाभावी प्रकल्पात असते . क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सीएसआर प्रकल्पा अंतर्गत पुणे येथील ५००० गरजू व गरीब कुटुंब सदस्याना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला .
महा एनजीओ फेडरेशन
या विषयावर तज्ञ बना.