महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. महबूबनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
महबूबनगर हा निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद राज्याचा दक्षिणेकडील जिल्हा होता. महबूबनगर हे शहर हैदराबादपासून ९६ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्वी “रुक्मम्मापेटा” आणि “पलामूरू”(दुधाची जमीन) म्हणून ओळखले जात असे. हैदराबादचा निजाम (१८६९-१९११) मीर महबूब अली खान असफ जाह सहावा यांच्या सन्मानार्थ ४ डिसेंबर १८९० रोजी हे नाव बदलून महबूबनगर करण्यात आले. महबूबनगर हे १८८३ पासून ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
महबूबनगर जिल्हा
यामागील विज्ञान आणि इतिहास.