महदाइसा ऊर्फ महदंबा या महानुभाव पंथातील एक महिला साधिका आहेत.त्यांचा जन्म मराठवाडयातील जालना जिल्ह्यामधे झाला.
श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री,तपस्विनी होती अशी तिच्याविषयी महानुभावांंची श्रद्धा आहे. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" अशा शब्दांंमधे महानुभावपंंथीय तिचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा महानुभाव पंथीयांना मार्गदर्शक आहे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात.आजही जालना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये महानुभाव पंथ मोठया प्रमाणात पसरलेला आहे.
महदाइसा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?