मलेशियामधील धर्म

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मलेशिया एक बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक देश असून, त्याचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, देशातील लोकसंख्येच्या ६१.३ टक्के लोक इस्लामचे अनुसरण करतात; तर १९.८ टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुसरण करतात; यशिवाय ९.२ टक्के लोक ख्रिश्चन धर्म अनुसरतात; ६.३ टक्के हिंदू धर्म; आणि ३.४ टक्के पारंपरिक चिनी धर्म अनुसरात. उर्वरित इतर धर्मांमधे ॲनिझिझम, लोक धर्म, शिख धर्म, बहाई विश्वास आणि इतर धार्मिक विश्वास प्रणालींचा समावेश आहे. मलेशियात स्वतःला निरीश्वरवादी म्हणविणाऱ्यांची संख्या कमी आहे; मलेशियन सरकारद्वारे नास्तिक आणि निरीश्वरवाद्यांवर भेदभाव केल्यासाठी सरकारवर मानवाधिकार संघटनांकडून टीका होत आहे, काही कॅबिनेट सदस्यांनी "धार्मिक स्वातंत्र्य म्हणजेच धर्माचे स्वातंत्र्य नसणे" असे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →