तिबेटमधील धर्म

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तिबेटमधील धर्म

तिबेट मध्ये बौद्ध धर्म हा सर्वात प्रमुख धर्म आहे. याशिवाय अन्य इतर धर्म सुद्धा तिबेटमध्ये अल्प प्रमाणात आहेत. ८व्या शतकापासून तिबेटमध्ये बौद्ध धर्म हा मुख्य धर्म म्हणून राहिलेला आहे. तिबेटचा ऐतिहासिक भाग (जातीय तिबेटी लोकसंख्या असलेले क्षेत्र) आजकाल मुख्यत्वे चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्राद्वारे आणि अंशतः क्विंगई आणि सिचुआन प्रांतांद्वारे समाविष्ट केला आहे. बौद्ध धर्माच्या आगमनापूर्वी तिबेटींमध्ये मुख्य धर्म एक स्वदेशी शमाणिक (shamanic) आणि ॲनिमस्टिक (animistic) धर्म होता, बॉन धर्म, जो आता एक अल्पसंख्याक आहे आणि तिबेटी बौद्ध धर्मापासून प्रभावित आहे.

२०१२ च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालातील अंदाजानुसार, बहुतांश तिबेटी (ज्यात तिबेट स्वायत्त प्रदेशाची ९०% लोकसंख्येचा सामील आहे) तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, तर अल्पसंख्याक ४,००,००० लोक (एकूण लोकसंख्येच्या १२.५%) हे मूळ बॉन किंवा लोक धर्माचे अनुयायी आहेत. काही अहवालांनुसार, चिनी सरकार बॉन धर्माला कन्फ्यूशियनिझमशी जोडून प्रचार करीत आहे.

तिबेट स्वायत्त प्रदेशात चार मशिदी आहेत ज्यात सुमारे ४,००० ते ५,००० मुसलमान अनुयायी आहेत, मात्र २०१० च्या चीनी सर्वेक्षणात हे प्रमाण ०.४% असल्याचे सांगितले होते. या भागात पूर्वेस यांजिंगच्या पारंपरिक कॅथोलिक समुदायांत ७०० परराष्ट्रांसह एक कॅथोलिक चर्च आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →