मलबार हिल विधानसभा मतदारसंघ - १८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मलबार हिल मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ४१६ -खेतवाडी, ४१८-गिरगांव, ४१९ - चौपाटी, ४२० - वाळकेश्वर आणि ४२१ - महालक्ष्मी यांचा समावेश होतो. मलबार हिल हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे मंगलप्रभात गुमानमल लोढा हे मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मलबार हिल विधानसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.