नागूर साहेब (टोपण नाव मनो) हे एक भारतीय पार्श्वगायक, व्हॉईस-ओव्हर कलाकार, अभिनेता आणि संगीतकार आहेत.
मनो यांनी चित्रपटातील आणि खाजगी विविध तेलुगू, तमिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम, हिंदी, तुलु, कोकणी आणि आसामी अशी २४,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांनी संपूर्ण खंडांमध्ये ३००० हून अधिक थेट मैफिली सादर केल्या आहेत. याच सोबत संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गाणी रेकॉर्ड केली आहेत. मुथु (१९९५) या तेलुगू चित्रपटापासून रजनीकांतसाठी डबिंग कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मनो यांचे लग्न जमीलाशी १९८५ मध्ये झाले. या दोघांना शाकीर नावाचा एक मुलगा आहे. शाकीर हा एक चित्रपट अभिनेता असून त्याने नांगा (२०१२) मध्ये काम केले आहे.
मनो
थोडक्यात पण महत्त्वाचे.