मनामा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मनामा

मनामा (अरबी: المنامة) ही पश्चिम आशियामधील बहरैन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मनमा शहर बहरैन बेटाच्या उत्तर भागात इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील मुहर्रक येथे स्थित होती. विसाव्या शतकामध्ये खनिज तेल विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र झाले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.

२०१२ साली मनामाला अरब लीगने अरबी सांस्कृतिक राजधानी घोषित केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →