मनस्विनी लता रवींद्र

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार, अभिनेत्री, दिग्दर्शक आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्यशिक्षण घेतल्यावर त्या मूबईला आल्या. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे होते. तसेच 'दिल दोस्ती दुनियादारी' ह्या मालिकेसाठी त्यांनी पटकथा-संवाद लेखन केले. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा-माधव' चित्रपट त्यांनीच लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →