मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.
दादर, परळ रेल्वे स्थानक आणि माटुंगा येथे मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद, सँडहर्स्ट रोड आणि कुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे. ठाणे येथून ट्रान्सहार्बर मार्ग तसेच दिवा आणि कोपर येथे वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे. नेरळवरून माथेरान डोंगरी रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.
मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?