पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो. मुंबईची पश्चिम उपनगरे जोडणारा हा मार्ग भाईंदर, वसई, विरार इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली.







दादर, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे पश्चिम व मध्य दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगाव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे. वसई रोड येथेसुद्धा वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →