हावडा−चेन्नई मुख्य रेल्वेमार्ग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हावडा−चेन्नई मुख्य रेल्वेमार्ग

हावडा-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाता व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,६६१ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. खरगपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर धावतो.

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.



हावडा-खरगपूर पट्टा

खरगपूर-खुर्दा रोड पट्टा

खुर्दा रोड-विशाखापट्टणम पट्टा

विशाखापट्टणम-विजयवाडा पट्टा

विजयवाडा-चेन्नई पट्टा

हावडा व चेन्नई दरम्यान धावणारी कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →