मदन विश्वनाथराव पाटील (२ डिसेंबर १९६० - १६ ऑक्टोबर २०१५) हे भारताच्या ११ व्या आणि १२व्या लोकसभेचे सदस्य होते. ते विश्वनाथराव शामराव पाटील यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू होते. त्यांनी बी.कॉम. (ऑनर्स) (चिंतामण राव कॉलेज), शिवाजी विद्यापीठ, सांगली येथून केले. त्यांनी महाराष्ट्राच्या सांगली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदन पाटील
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!