मंथन (चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मंथन (The churning या अनुवादित शीर्षकाखाली देखील प्रदर्शित झाला होता) हा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला १९७६ चा हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट वर्गीस कुरियन यांच्या दूध सहकारी चळवळीपासून प्रेरित आहे आणि तो आणि विजय तेंडुलकर यांनी संयुक्तपणे लिहिलेला आहे. हे भारताच्या श्वेतक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाने मोठे यश कमावले होतेच, परंतु याने "सामूहिक सामर्थ्या" चे देखील प्रदर्शन केले कारण याची निर्मिती पूर्णपणे सामूहिक निधीवर झाली होती. एकूण ५,००,००० शेतकऱ्यांनी प्रत्येकी ₹२ जमा चित्रपटासाठी जमा केले होते. सामूहिक निधी (क्राउडफंड) द्वारे तयार केलेला मंथन हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

या चित्रपटाला १९७७ चा हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि विजय तेंडुलकर यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. १९७६ च्या च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठीही भारताकडून हा चित्रपट पाठवला गेला होता. चित्रपटाचे शीर्षक गीत ("मेरो गाव कथा परे") प्रीती सागरने गायले होते. तिला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हे गाणे नंतर अमूलच्या दूरचित्रवाणी जाहिरातीसाठी साउंडट्रॅक म्हणून वापरले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →