श्याम बेनेगल (डिसेंबर १४, १९३४ - डिसेंबर २३, २०२४) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शिक, पटकथा लेखक व निर्माते होते. समांतर सिनेमाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे, हे १९७० नंतरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जात असे. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले ज्यात १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार व एक नंदी पुरस्कार आहे. सोबतच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री (१९७६) आणि पद्मभूषण (१९९१) देखील प्रदान केले. २००५ मध्ये त्यांना चित्रपटसृष्तीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
कॉपीरायटर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी १९६२ मध्ये गुजराथी भाषेत आपला पहिला माहितीपट, घेर बेथा गंगा (दरवाजावर गंगा) बनवला. बेनेगलांचे पहिले चार चित्रपट - अंकुर (१९७३), निशांत (१९७५), आणि भूमिका (१९७७) यांनी समांतर सिनेमा/ नवीन लहर चित्रपट चळवळीचे सुरू केली. बेनेगलच्या "मुस्लिम महिला त्रयी" चित्रपट मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), आणि झुबैदा (२००१) या सर्वांनी हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. बेनेगल यांनी सात वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
ते २००६-१२ मध्ये भारताच्या राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.
श्याम बेनेगल
थोडक्यात पण महत्त्वाचे.