मंझिलें और भी हैं

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मंझिलीं और भी हैं हा १९७४ चा महेश भट्ट दिग्दर्शित बॉलीवूड क्राइम थ्रिलर चित्रपट आहे आणि त्यात कबीर बेदी, प्रेमा नारायण आणि गुलशन अरोरा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

भट्टयांच्या दिग्दर्शनातील हा पहिला चित्रपट दोन पळालेल्या अपराद्यांबद्दाल आणि एका वेश्येशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल होता. हा चित्रपट १९७२ मध्ये बनवण्यात आला होता आणि सुरुवातीला त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते आणि "विवाहाच्या पवित्र संस्थेची खिल्ली उडवल्याबद्दल" भारतीय सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे चित्रपट १४ महिने रोखण्यात आला होता. तथापि, दीर्घ विलंबानंतर सरकारने हस्तक्षेप केला, बोर्डाला रद्दबातल ठरवले आणि इतर चार बंदी घातलेल्या चित्रपटांसह ह्या चित्रपटाला मान्यता दिली. १९७४ मध्ये जेव्हा तो अखेर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला ना टीकात्मक यश मिळाले ना व्यावसायिक यश.

भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राज खोसला यांच्यासोबत केली. त्यानंतर १९७२ मध्ये, निर्माता आणि मित्र जॉनी बक्षी यांनी भट्ट यांना ह्या चित्रपटाची कथा एकवली व त्यांनी काम स्वीकारले. चित्रपटाचे संवाद प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि नाटककार सत्यदेव दुबे यांनी लिहिले होते.

चित्रपटाचे संगीत भूपेंद्र सोनी यांचे होते, तर गीते योगेश यांनी लिहिली होती. आशा भोसले आणि भूपेन्द्र सिंह यांनी गाणी गायली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →