मंगरूळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मंगरूळ हे खेडेगाव भारतीय संघराज्याच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भोल्डी नदीच्या काठावर वसलेले आहे. मंगरूळ हे गाव मंगळेश्वराचे हेमाडपंथी मंदिर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. मंगरूळ गावाच्या मध्यभागी मांगवीर बाबाचे मोठे मंदिर आहे. ते एक जागृत दैवत मानले जाते. त्याच्या दर्शनाकरिता दर अमावस्येला भक्तांची गर्दी असते. तसेच गावापासून दक्षिणेला अर्धा किमी अंतरावर असलेल्या छोट्या टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे.

मंगरूळ गावात जिल्हा परिषदेची इयत्ता १ ते ७ पर्यंतची शाळा आहे. इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात सोनाई शिक्षण संस्था चिंचोली लिंबाजी संचलित मंदोदरी माध्यमिक विद्यालय आहे.

मंगरूळ गावातील आजपर्यंतचे सरपंच,उपसरपंच व कालावधी

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →