मालवण

या विषयावर तज्ञ बना.

मालवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे प्रमुख तालुक्याचे ठिकाण आहे. मालवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सागरी शहर आहे. मालवण शहराची लोकसंख्या साधारण २२,००० च्या आसपास आहे. हे शहर पोर्तुगालीन धाटणीचे असून प्रथम हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात होते, तद्नंतर हे शहर इंग्रजांच्या ताब्यात आले व नंतर कोल्हापूरचे संस्थानिक यांच्या ताब्यात गेले. या शहराची नगरपालिका १ मे, १९१८ साली स्थापन करण्यात आली. या शहराला शंभरहून अधिक वर्षाचा प्रदीर्घ काळ लाभला आहे.

शिवाजी महाराजांचा सर्वात प्रिय असा सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्याचे इंग्रजांनी नामांतर रोमन राजा ऑगस्टस याच्यावरून फोर्ट ऑगस्टस केले, पण हा किल्ला करवीर संस्थानाच्या ताब्यात आल्यानंतर याचे मूळ नाव सिंधुदुर्ग हेच कायम करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे बेटावर हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. हा किल्ला तब्बल ४८ एकर इतका पसरलेला आहे.

मालवण शहर व तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत तालुका आहे.सर्वात जास्त उत्पन्न याच शहरातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा हा जेव्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यात मालवण तालुक्याचे ७०% योगदान होते.

मालवण हा असा एकमेव जिल्ह्यातील तालुका आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन जसे की आंबा, काजू, नारळ, मासे, कलिंगड, ऊस, सुपारी, तांदूळ, रातांबे ही सर्व उत्पादने खूप जास्त प्रमाणात उत्पादित होतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमुख फळ किंवा उत्पादन हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते. पण मालवण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारे सर्वच प्रकारचे फळ व इतर गोष्टी समप्रमाणामध्ये उत्पादित होतात, हे या तालुक्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →