वडाचापाट

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वडाचापाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील गाव आहे.

हे गाव ७०४ हेक्टर क्षेत्राचे मालवणपासून १७ कि.मी अंतरावर वसलेले आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथून २० कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५५ कुटुंबे व एकूण ९७६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मालवण MALWAN २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८३ पुरुष आणि ४९३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४१ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६५७६ आहे.

या गावात विभाग ३ आहेत. व एकूण वाड्या ८ आहेत. यामध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ हे -७०३ आर ४५, हे आहे.

अश्याप्रकारे चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेल्या सपाटीच्या माथ्यावर वडाचापाट हा गाव वसलेला आहे. हा परिसर फळफळावळीमुळे झाडांझुडपांमुळे समृद्ध बनलेला आहे .पाटाचा (पाण्याचा ओहळ) सान्निध्यात व वटवृक्षाच्या छायेत येथील परिसर व्यापला आहे. कदाचित याचमुळे गावाचे नाव वडाचापाट म्हणून नावारूपास आले .स्वयंभू श्री.शांतादुर्गा देवीचे नवसाला पावणारे अतिप्राचीन व जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी मद्यसेवन व मांस वर्ज्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →