भौगोलिक मानांकन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (इंग्रजी:जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (उदा. एखादे स्थान, गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या रूपात हे प्रमाणित करतो की, त्या उत्पादनात विशिष्ट गुणधर्म आहेत. तो तेथिल प्रचलीत पारंपारिक पद्धतींद्वारे बनविला गेला आहे किंवा त्याचे भौगोलिक स्थानामुळे त्यास विशिष्ठ प्रकारची प्रतिष्ठा आहे.

मूळ स्थानाचे नाव हे भौगोलिक सूचकांकाचा एक उपप्रकार आहे जिथे गुणवत्ता, पद्धत आणि त्या उत्पादनाची प्रतिष्ठा ही 'बौद्धिक संपत्ती अधिकार नोंदणी' अंतर्गत पारिभाषित केलेल्या निर्णायक क्षेत्रापासून बनविली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →