मराठा ही एक महाराष्ट्रातील दख्खनी शाखा किंवा जात आहे. मराठा , भारतातील इतिहासात पराक्रमी योद्धे म्हणुन ओळखले जातात. महाराष्ट्राचे नाव महा रट्ट (मराठा) यांच्यावरूनच आले आहे.
मराठा - शालिवाहन साम्राज्याच्या नाणेघाटातील शिलालेखात महा रट्ट म्हणजेच मराठा वंशाचा उल्लेख आहे.
भारतीय इतिहासात मराठा (महा रट्ट) हा राज्यकर्ता समाज आहे. त्यांची लोकसंख्या प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात जास्त आहे, जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई पासून गोव्यापर्यंत आणि नागपूरच्या पूर्वेस सुमारे १०० मैल (१६० किमी) अंतर्देशीय भागात पसरलेले मराठी भाषिक प्रदेश आहे. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे.
मराठा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?