भेळपुरी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भेळपुरी हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खारट,आंबट,गोड,तिखट एकत्रित करून बनविलेला चवदार उपहार आहे. हा गप्पा मारता मारता खाण्यासाठीही उपयोगात आणला जातो. हा चाट चा एक प्रकार आहे. हे बनविण्यासाठी जाडे तांदूळ, भाज्या आणि सॉस यांचा वापर करतात.

भेळपुरी मुंबईचे गिरगाव, जुहू, या चौपाटीवर नियमित मिळते. मुंबईतील सर्व गल्लीबोळातून याच्या फिरत्या गाड्या पाहावयास मिळतात. हा उपहार रस्त्यावर खाण्याचाच आहे हे विचार ग्रहित धरलेले आहेत. भेळपुरीचा प्रसार अगदी भारतातील कानाकोपऱ्यात झालेला आहे. भारताचे विविध प्रदेशात त्या त्या हवामानानुसार किंवा परिस्थितीनुसार भेळपुरी बनविण्यासाठी तेथील उपलब्ध पदार्थांचा वापर केला जातो. भेळपुरीचे मूळं स्वरूप भडंग आहे. भडंग हा पच्छीम महाराष्ट्रातील उत्तम असा तेलकट, आंबट, गोड, तिखट, चवीचा पदार्थ आहे. भडंगचा वापर करून कोरडी भेळपुरी तयार केली जाते. कोलकत्ता मध्ये भेळपुरीला झालमुरी म्हणतात. तेथे ही तेल वापरून जाडे भातापासून बनवितात. मैसूर मध्ये भेळपुरीला चुरुमुरी आणि बंगलोर मध्ये चुरमुरी म्हणतात. कोरडी भेळपुरी जी भडंग म्हणून प्रसिद्ध आहे तिच्यावर कांदा, लिंबू रस, कोथिंबीर, यांचा दिमाखदार थर पसरवून लिंबूरस पिळून ती खावयास देतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →