भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे. ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते. अश्या साठ्यास जलधारक म्हणतात. यापासून वापरण्यायोग्य पाणी मिळू शकते. पाण्याची ती खोली ज्यावर मातीच्या छिद्रात,भेगात अथवा पोकळीत पाणी पूर्णपणे संपृक्त होते त्यास 'भूजलपातळी' (वॉटरटेबल) असे म्हणतात. याचे पावसाने व इतर कारणांनी जसे प्रवाह इत्यादी, पुनर्भरण होते. ते मग जमिनीच्या पातळीवर येउन वाहते.
त्याच्या होणाऱ्या निचऱ्यास,त्याचा एकूण उतारा पाहून, त्यास झरा,पाझर,मरुवन किंवा दलदल असे म्हणतात. भूजल हे शेतीसाठी उद्योगासाठी किंवा नागरिकांना पिण्यासाठी वापरण्यात येते. या पाण्याचे नियोजनास/वितरणास/निचऱ्याच्या अभ्यासास भूजलशास्त्र असे म्हणतात.
भूजल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?