भुजंगधारी खगोलीय विषुववृत्तावरील एक मोठा परंतु अंधुक तारकासमूह आहे. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांपैकी हा एक आहे. याला इंग्रजीमध्ये Ophiuchus (ऑफियुकस) म्हणतात. हे मुळ ग्रीक नाव असून त्याचा अर्थ साप (भुजंग) धारण केलेला असा होतो. याला एक माणूस साप धरत आहे असे दर्शवले जाते ज्यामध्ये साप भुजंग या तारकासमूहाने दर्शवला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भुजंगधारी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.