धोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी मनात निर्माण होणारी शारीरिक हानीची ,धोक्याची,वा इजा होणारी संकल्पना व अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय.
एखाद्या वस्तू व प्रसंगा पासून व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल व प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक संकल्पना म्हणजेच भीती होय
भीती ही एक मानसिकता किवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर ही भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्रा आणि ह्याचं हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.
भीती
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.