नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.
जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.
नैराश्य
थोडक्यात पण महत्त्वाचे.