भिडेवाडा (पुणे)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भिडेवाडा (पुणे)

भिडेवाडा ही पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे. या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती. भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी एक ही शाळा होती. यामध्ये शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले.

सध्या या ठिकाणी पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. फुले दांपत्याने शाळा सुरू केली तो काळ, त्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा इतिहास स्मारकाच्या रूपात उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींसाठी शाळा देखील पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →