फातिमा शेख या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले. फातिमा शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी झाला.
मियां उस्मान शेख या त्यांच्या भावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.
९ जानेवारी २०२२ रोजी, गुगलने फातिमा यांना १९१ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले.
फातिमा शेख
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.